• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER

प्र.1 ) 2, 5, 11, 20, 32, 47, ?

अ) 68
ब) 65
क) 62
ड) 64
उत्तर - 65

प्र.2 ) AY= 25 तर CH= ?

अ) 30
ब) 27
क) 24
ड) 31
उत्तर - 24

प्र.3 ) DP = HP तर CQ = ?

अ) GM
ब) IN
क) FM
ड) HP
उत्तर - GM

प्र.4 ) आकाशला तीन बहीणी व तीन भाऊ आहेत. चैतालीला दोन बहीणी व तीन भाऊ आहेत. सौरभ चैतालीचा भाऊ आहे व आकाशची बहीण सरला आहे. तर सर्वांत जास्त भाऊ कुणाला आहेत ?

अ) सौरभ
ब) चैताली
क) आकाश
ड) सरला
उत्तर - सरला

प्र.5 ) वांग्याला टोमॅटो म्हटले, टोमॅटोला भेंडी म्हटले, भेंडीला कारले म्हटले, कारल्याला गाजर म्हटले तर भेंडींच्या भाजीसाठी कशाचा वापर करावा.

अ) गाजर
ब) कारले
क) टोमॅटो
ड) भेंडी
उत्तर - कारले

प्र.6 ) एका 30 मीटर लांबीच्या कापडातून रोज 3 मीटर कापडाचा तुकडा कापलला तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील ?

अ) 9
ब) 10
क) 19
ड) 18
उत्तर - 9

प्र.7 ) 350000004 अक्षरी--------------------?

अ) तीन कोटी पन्नास लाख
ब) पस्तीस लाख चार
क) पस्तीस कोटी चार
ड) तीन कोटी पाचलाख
उत्तर - पस्तीस कोटी चार

प्र.8 ) जर BOAT साठी 2- 15- 1- 20 तर TALK साठी-----------

अ) 20-1-12-11
ब) 20-11-2-11
क) 20-10-2-11
ड) 20-11-21-1
उत्तर - 20-1-12-11

प्र.9 ) मालीकेत रिकाम्या जागी कोणती संख्या येईल. 2, 7, 14, 23, 34, ----?, 62

अ) 45
ब) 47
क) 39
ड) 38
उत्तर - 47

प्र.10 ) महाराष्ट्र : पुरणपाळी : : बंगाल : ?

अ) बासुंदी
ब) श्रीखंड
क) रसगुल्ला
ड) बर्फी
उत्तर - रसगुल्ला

प्र.11 ) भारताचे विद्यमान संरक्षणमंत्री कोण आहेत ?

अ) मनोहर पर्रीकर
ब) अरुण जेटली
क) सुभाष भामरे
ड) यापैकी नाही
उत्तर - अरुण जेटली

प्र.12 ) महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची कमाल संख्या किती.

अ) 288
ब) 388
क) 188
ड) 552
उत्तर - 288

प्र.‍13 ) महाराष्ट्राचा अती दक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे ?

अ) केाल्हापुर
ब) सिंधुदुर्ग
क) रत्नागिरी
ड) यापैकी नाही
उत्तर - सिंधुदुर्ग

प्र.14 ) जनगणना 2011 नुसार, महाराष्ट्र हे देशात लोकसंख्येच्या बाबतीत कितवे क्रमांकाचे राज्य ठरते ?

अ) पहिले
ब) दुसरे
क) तिसरे
ड) चौथे
उत्तर - दुसरे

प्र.15 ) बांधकाम क्षेत्र, कृ्षीक्षेत्र यांमध्ये जेसीबी नावाचे यंत्र वापरणे नित्याचे आहे. 'जेसीबी' हे खालीलपैकी कशाचे संक्षिप्त रुप आहे ?

अ) जोसेफ सिरील बिम्सटेक
ब) जोसेफ सिरील बॅम्सफोर्ड
क) जुलियन सिरील बॅम्सफोर्ड
ड) वरीलपैकी नाही
उत्तर - जोसेफ सिरील बॅम्सफोर्ड

प्र.16 ) खालीलपैकी कोणता तालुका नाही ?

अ) शिंदखेडा
ब) साक्री
क) शिरपुर
ड) दोंडाईचा
उत्तर - दोंडाईचा

प्र.17 ) भारतातील अती पश्चिमेकडील व अती पुर्वेकडील राज्याची जोडी ओळखा.

अ) गुजरात-अरुणाचल प्रदेश
ब) राजस्थान-अरुणाचल प्रदेश
क) गुजरात-नागालँड
ड) राजस्थान-आसाम
उत्तर - गुजरात-अरुणाचल प्रदेश

प्र.18 ) महाराष्ट्रात आमदार (विधानसभा सदस्य) होण्याकरीता वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण केलेली असावीत ?

अ) 18
ब) 21
क) 25
ड) 30
उत्तर - 25

प्र.19 ) IPL - 23017 मधील पहिला सामना कोणत्या दोन संघामध्ये खेळला गेला ?

अ) दिल्ली डेअरडेविल्स- मुंबई इंडियन्स
ब) रॉयल चॅलेंजर बॅगलोर - सनरायझर्स हैदराबाद
क) मुंबई इंडियन्स-कोलकत्ता नाईट रायडर्स
ड) यापैकी नाही
उत्तर - रॉयल चॅलेंजर बॅगलोर - सनरायझर्स हैदराबाद

प्र.20 ) भारताने अग्नी - 5 मिसाईलचे प्रक्षेपण कोणत्या राज्याच्या किनारी प्रदेशाजवळ केले ?

अ) आध्रप्रदेश
ब) उडीसा
क) केरळ
ड) यापैकी नाही
उत्तर - उडीसा

प्र.21 ) विमुद्रीकरणानंतर नवीन स्वरुपात चलनात आलेल्या 500 रुपयाच्या नोटेवर खालीलपैकी कोणती प्रतिकृती आपणांस पाहावयास मिळते ?

अ) ताजमहल
ब) लालकिल्ला
क) गेट वे ऑफ इंडिय
ड) चारमिनार
उत्तर - लालकिल्ला

प्र.22 ) नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुका पाहता खालील पैकी कोणत्या राज्यात निवडणुक झाली नाही ?

अ) उत्तराखंड
ब) आसाम
क) मणिपुर
ड) यापैकी नाही
उत्तर - आसाम

प्र.23 ) खालीलपैकी कोणते नगर/शहर धुळे जिल्हयात नाही.

अ) शहादा
ब) पिंपळनेर
क) साक्री
ड) शिरपुर
उत्तर - शहादा

प्र.24 ) महाराष्ट्रास खाललपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही ?

अ) मध्यप्रदेश
ब) छत्तीसगड
क) आंध्रप्रदेश
ड) यापैकी नाही
उत्तर - आंध्रप्रदेश

प्र.25 ) मतदान करण्यासाठी खालीलपैकी कोणती अट पूर्ण होणे आवश्यकच आहे ?

अ) वय १८ वर्ष पूर्ण
ब) लिहिता वाचता येणे
क) ओळखीची कोणतेही दोन पुरावे
ड) यापैकी नाही
उत्तर - वय १८ वर्ष पूर्ण

प्र.26 ) ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय आहे ?

अ) किसन बाबुराव हजारे
ब) कृष्णा बापूराव हजारे
क) आण्णा कृष्णा हजारे
ड) किसन कृष्णा हजारे
उत्तर - किसन बाबुराव हजारे

प्र.27 ) सध्या Whatsapp या सोशल मिडीयावर GIF नावाने चलचित्र डाउनलोड केले जाते. GIF म्हणजे ?

अ) Graph International Feature
ब) Graphics Interchange format
क) Graphics Interchange font
ड) यापैकी नाही
उत्तर - Graphics Interchange format

प्र.28 ) महाराष्ट्रातील मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही ?

अ) पुणे
ब) औरंगाबाद
क) नागपूर
ड) यापैकी नाही
उत्तर - पुणे

प्र.29 ) भारतात पिनकोड क्रमांक वितरीत केले आहेत. पिनकोड प्रणाली अंतर्गत पहिले तीन अंक काय दर्शवितात ?

अ) वितरणाचा तालुका
ब) वितरणाचा जिल्हा
क) उपक्षेत्र
ड) वितरण डाकघर
उत्तर - वितरणाचा जिल्हा

प्र.30 ) भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?

अ) डॉल्फिन ( गंगानदी )
ब) डॉल्फिन (कोणताही जलस्त्रोत )
क) देवमासा
ड) समुद्रीसाप
उत्तर - डॉल्फिन ( गंगानदी )

प्र.31 ) देवीच्या साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धे पीठ कोणते ?

अ) तुळजापुर
ब) माहूर
क) कोल्हापूर
ड) वणी ( नाशिक )
उत्तर - वणी ( नाशिक )

प्र.32 ) महाराष्ट्रात आज पर्यंतच्या कार्यकालात एकूण महिला मुख्यमंत्री किती ?

अ) 1
ब) 2
क) 3
ड) यापैकी नाही
उत्तर - यापैकी नाही

प्र.33 ) धुळे जिल्ह्यातून खालील पैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो ?

अ) रा.म.6
ब) रा.म.50
क) रा.म.9
ड) रा.म.8
उत्तर - रा.म.6

प्र.34 ) पोलीस खाते हा . . . . . . . . . . . . . सूचीतील विषय आहे.

अ) संघ
ब) राज्य
क) समवर्ती
ड) यापेक्षा वेगळे उत्तर
उत्तर - राज्य

प्र.35 ) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?

अ) महात्मा गांधी
ब) महात्मा फुले
क) गो.ग. आगरकर
ड) गो.ह. देशमुख
उत्तर - महात्मा फुले

प्र.36 ) खालील पैकी कोणता उदासीन वायू आहे ?

अ) मिथेन
ब) नायट्रोजन डायऑक्साईड
क) सल्फर ट्रायऑक्साईड
ड) हायड्रोजन सल्फाईड
उत्तर - मिथेन

प्र.37 ) पानीपतची तिसरी लढाई अहमद शाह अब्दाली व . . . . . . . . . . . . यांच्यात झाली ?

अ) राजपुत
ब) शिख
क) मुघल
ड) मराठे
उत्तर - मराठे

प्र.38 ) भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?

अ) आचार्य कृपलानी
ब) महात्मा गांधी
क) पंडीत नेहरू
ड) दादाभाई नौरोजी
उत्तर - आचार्य कृपलानी

प्र.39 ) पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना महाराष्ट्रात क्रमाने येणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखा ?

अ) नाशिक - औरंगाबाद - परभणी - जालना
ब) औरंगाबाद - नाशिक - जालना - परभणी
क) नाशिक -जालना - औरंगाबाद - परभणी
ड) नाशिक - औरंगाबाद - जालना - परभणी
उत्तर - नाशिक - औरंगाबाद - जालना - परभणी

प्र.40 ) कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते ?

अ) सम्राट अशोक
ब) आर्य चाणक्य
क) सम्राट पुलकेशी
ड) सम्राट हर्षवर्धन
उत्तर - सम्राट अशोक

प्र.41 ) महाराष्ट्राचे पोलीस संचालक कोण आहेत ?

अ) श्री. सतीष माथुर
ब) श्री. संजीव दयाल
क) श्री. दत्ता पळसलगीरकर
ड) श्री. अहमद जावेद
उत्तर - श्री. सतीष माथुर

प्र.42 ) BS-III, BS-IV सध्या चर्चेत आहेत. यातील BS म्हणजे . . . . . . . . . . .

अ) भारत स्टेज
ब) बायो सिस्टीम
क) बायो सोर्स
ड) यापैकी नाही
उत्तर - भारत स्टेज

प्र.43 ) स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम . . . . . . . . . या देशाने बहाल केला.

अ) भारत
ब) न्युझिलंड
क) अमेरिका
ड) इंग्लंड
उत्तर - न्युझिलंड

प्र.44 ) कल्याणसोना ही कोणत्या धान्याची जात आहे.

अ) गहू
ब) बाजरी
क) तांदूळ
ड) ज्वारी
उत्तर - गहू

प्र.45 ) सार्वजनिक वाहतूक संस्थेतील S.T बस सर्वाना परिचित आहे. यातील ST हे कशाचे संक्षिप्त रूप आहे.

अ) सेफ ट्रान्सपोर्ट
ब) स्टेट ट्रान्सपोर्ट
क) स्लॉट ट्रान्सफर
ड) स्लोअर ट्रान्सफर
उत्तर - स्टेट ट्रान्सपोर्ट

प्र.46 ) अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ?

अ) जॉर्ज बुश
ब) हिलरी क्लिंटन
क) बराक ओबामा
ड) डोनाल्ड ट्रम्प
उत्तर - डोनाल्ड ट्रम्प

प्र.47 ) ग्राम पंचायतीत जास्तीत जास्त किती सदस्य संख्या किती असू शकते ?

अ) 15
ब) 17
क) 13
ड) 20
उत्तर - 17

प्र.48 ) महाराष्ट्रात खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक महानगर पालिका आहेत ?

अ) मुंबई
ब) पुणे
क) ठाणे
ड) नागपूर
उत्तर - ठाणे

प्र.49 ) खालील पैकी कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिला जात नाही.

अ) शांतता
ब) साहित्य
क) कला
ड) रसायन शास्त्र
उत्तर - कला

प्र.50 ) २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक मध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले ?

अ) सायना नेहवाल
ब) दीपा करमाकर
क) ललिता बाबर
ड) साक्षी मलिक
उत्तर - साक्षी मलिक

प्र.51) 21 से.मी. त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

अ) 1232 चौ.से.मी
ब) 1386 चौ.से.मी
क) 962.5 चौ.से.मी
ड) 693 चौ.से.मी
उत्तर - 1386 चौ.से.मी

प्र.52 ) दिलीप व मधु यांच्या वयात 12 वर्षाचे अंतर आहे, मधु दिलीप पेक्षा 12 वर्षांनी लहान आहे; तर 6 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती होईल ?

अ) 24 वर्षे
ब) 12 वर्षे
क) 6 वर्षे
ड) 18 वर्षे
उत्तर - 12 वर्षे

प्र.53 ) 3 व 5 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?

अ) 51925
ब) 63345
क) 91215
ड) 75245
उत्तर - 91215

प्र.54 ) एका कुरणात एक बैल एका खांबाला 10.5 मीटर लांबीच्या दोराने बांधलेला आहे तर तो किती किती क्षेत्रातील गवत खाऊ शाकेल.

अ) 346.5 चौ.मी.
ब) 110.25 चौ.मी.
क) 33 चौ.मी.
ड) 42 चौ.मी.
उत्तर - 346.5 चौ.मी.

प्र.55 ) 1 मीटर बाजू असलेल्या घनात किती मीटर पाणी मावेल ?

अ) 100
ब) 1000
क) 10000
ड) 1
उत्तर - 1000

प्र.56 ) एक टाकी 2 नळ चालू असता 12 तासात भरते, तीच टाकी 3 लळ चालू असतील तर -------- तासात भरते ?

अ) 18
ब) 8
क) 13
ड) 11
उत्तर - 8

प्र.57 ) 31 डिसेंबर 2008 रोजी बुधवार होता ; तर 1 मार्च 2009 रोजी कोणता वार असेल ?

अ) सोमवार
ब) रविवार
क) शनिवार
ड) गुरुवार
उत्तर - रविवार

प्र.58 ) शेकडा 10 सुट दिल्यानंतर बका कपडयसाठी 450 रु. द्यावे लागतात; तर त्या कपडयाची छापील किंमत किती ?

अ) 495
ब) 460
क) 500
ड) 490
उत्तर - 500

प्र.59 ) 36/4 = 9 तर 3.6 /0.04 =?

अ) 0.9
ब) 9
क) 90
ड) 0.09
उत्तर - 90

प्र.60 ) 9 कि.ग्रॅ. हापूस आंब्याची किंमत 1440 रु. आहे, तर 2.5 कि.गॅ. आंब्याची किंमत किती ?

अ) 160 रु
ब) 400 रु
क) 720 रु
ड) 250 रु
उत्तर - 400 रु

प्र.61 ) कारगीलच्या युध्दात तोफेमधून टायगर हिलवरील शत्रूवर टाकलेला गोळा 3.5 सेकंदात 105 किमी अंतर तोडतो, तर गोळयाचा वेग प्रति सेकंद किती ?

अ) 35 किमी
ब) 27.5 किमी
क) 29.5 किमी
ड) 30 किमी
उत्तर - 30 किमी

प्र.62 ) एका नावेत सरासरी 22 कि. ग्रॅ. वजनाची 25 मुले बसली नावाडयासह सर्वाचे सरासरी वजन 24 कि.ग्रॅ. झाले तर नावाडयाचे वजन किती ?

अ) 74 कि.ग्रॅ.
ब) 71 कि.ग्रॅ.
क) 75 कि.ग्रॅ.
ड) 100 कि.ग्रॅ.
उत्तर - 74 कि.ग्रॅ.

प्र.63 ) 91 + 92 + 93 + ------- + 100 = ?

अ) 945
ब) 935
क) 955
ड) 985
उत्तर - 955

प्र.64 ) रामकडे 1 रु., 2 रु, 5रु. ची समान नाणी असून एकूण रक्कम 40 रु. आहे, तर रामजवळ एकूण किती नाणी आहेत ?

अ) 5
ब) 10
क) 15
ड) 8
उत्तर - 15

प्र.65 ) 0.2 + 0.002 + 2 + 0.02 = ?

अ) 2.222
ब) 2.02
क) 2.0002
ड) यापैकी नाही
उत्तर - 2.222

प्र.66 ) हिचे सासरे ज्यांचे वडील त्यांचे सासरे हे माझे वडील आहेत' एका स्त्री ची ओळख करुन देतांना भाऊराव म्हणाले . तर ती स्त्री भाऊरावांची कोण ?

अ) भाची
ब) वहीणी
क) पत्नी
ड) बहीण‍
उत्तर - बहीण‍

प्र.67 ) परवा दिपक माझ्याकडे आला तो म्हणाला ' परवा गुरुवारी मी तुला भेटणार होतो' तरदिपक माझ्याकडे आला तो वार कोणता होता ?

अ) मंगळवार
ब) बुधवार
क) सोमवार
ड) शनिवार
उत्तर - शनिवार

प्र.68 ) रामचे वय हरीच्या वयाच्य तिप्पट आहे. दोघांच्या वयातील फरक 16 वर्ष असल्यास, दोघांच्या वयाची बेरीज किती ?

अ) 24 वर्षे
ब) 32 वर्षे
क) 40 वर्षे
ड) 48 वर्षे
उत्तर - 32 वर्षे

प्र.69 ) रवि उगवता सुर्य पाहत होता. तो डावीकडे एकदा काटकोनातून व उजवीकडे दोनदा काटकोनात वळला, तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती ?

अ) पश्चिम
ब) उत्तर
क) पूर्व
ड) दक्षिण
उत्तर - दक्षिण

प्र.70 ) रांगेतील तुमचा क्रमांक दोन्ही बाजुंनी अकरावा असल्यासस रांगेत एकूण मुले किती ?

अ) 22
ब) 23
क) 21
ड) यापैकी नाही
उत्तर - 21

प्र.71 ) जर 5 × 9 = 54, 7 × 4 = 82 तर 9 × 8 = ?

अ) 27
ब) 49
क) 63
ड) 72
उत्तर - 27

प्र.72 ) 'अहमदनगर' या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होवू शकत नाही.

अ) मदन
ब) मगर
क) मदत
ड) नगर
उत्तर - मदत

प्र.73 ) एक पासून सात पर्यंतचे अंक याच क्रमाने पुन्हा -पुन्हा लिहीत गेल्यस 100 व्या क्रमांकावर कोणता अंक येईल ?

अ) 3
ब) 4
क) 2
ड) 1
उत्तर - 2

प्र.74 ) आरोग्य : आजार : : पाऊस : ?

अ) ‍पाणी
ब) दुष्काळ
क) पूर
ड) हाहाकार
उत्तर - दुष्काळ

प्र.75 ) डास, माशी, मुंगी, झुरळ या शब्दगटात खालीलपैकी कोणता शब्द बसेल ?

अ) गांडूळ
ब) किटक
क) टोळ
ड) पाल
उत्तर - टोळ

प्र.76 ) आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे ------------ असते.

अ) शब्द
ब) सर्वनाम
क) क्रियापद
ड) विधान
उत्तर - विधान

प्र.77 ) जावई या शब्दातील 'ज' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे.

अ) दंत्य
ब) औष्ठय
क) दंततालव्य
ड) तालव्य्‍ा
उत्तर - दंततालव्य

प्र.78 ) 'आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्यापरि' या वाक्यातील अलंकार ओळखा.

अ) उपमा
ब) अनन्वय
क) अनुप्रास
ड) यमक
उत्तर - अनन्वय

प्र.79 ) 'चित - आनंद' या विग्रह केलेल्या शब्दाचा बकच सामासिक शब्द कोणता ?

अ) चिदनानंद
ब) चितानंद
क) चिदानंद
ड) चिन्मयानंद
उत्तर - चिदानंद

प्र.80 ) 'उंटावरचा शहाणा' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

अ) मूर्ख माणूस
ब) मूर्खपणाचा सल्ला देणारा
क) खुप हुशार माणूस
ड) खुशामती माणूस
उत्तर - मूर्खपणाचा सल्ला देणारा

प्र.81 ) ' केसाने गळा कापणे' हया म्हणीचा अर्थ सांगा.

अ) दमबाजी करणे
ब) शत्रुत्व निर्माण करणे
क) विश्वासघात करणे
ड) ठार मारणे
उत्तर - विश्वासघात करणे

प्र.82 ) 'विधूर' या शब्दाचा स्त्रीलिंग शब्द कोणता ?

अ) विदुषी
ब) विधवा
क) विधुरिण
ड) सधवा
उत्तर - विधवा

प्र.83 ) ' गाणे सर्वांना आवडते' या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करतो ?

अ) नामाचे
ब) सर्वनामाचे
क) कि्रियापदाचे
ड) धातुसाधित नामाचे
उत्तर - धातुसाधित नामाचे

प्र.84 ) खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता ?

अ) पाखरु
ब) अश्रू
क) पिसू
ड) सासू
उत्तर - अश्रू

प्र.85 ) 'देह जावो अथवा राहो / पोडुरंगी दृढ भावो// या वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा

अ) अथवा
ब) देह
क) भावो
ड) यापैकी नाही
उत्तर - अथवा

प्र.86 ) 'सध्या तरि मला अभ्यास करावा असे वाटत आहे ' या वाक्यचा काळ ओळखा.

अ) साधा वर्तमानकाळ
ब) पूर्ण वर्तमानकाळ
क) अपूर्ण वर्तमानकाळ
ड) रीती वर्तमानकाळ
उत्तर - अपूर्ण वर्तमानकाळ

प्र.87 ) ' न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

अ) कर्तु-भावे
ब) कर्तृ-कर्म
क) कर्मकर्तरी
ड) कर्तरी
उत्तर - कर्मकर्तरी

प्र.88 ) 'सूर्य ढगामागे लपला' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ?

अ) ला
ब) ढग
क) मागे
ड) कोणतेही नाही
उत्तर - मागे

प्र.89 ) 'समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत' शब्दशक्ती ओळखा.

अ) लक्ष्यार्थ
ब) वाच्यार्थ
क) संकेतार्थ
ड) व्यंगार्थ
उत्तर - व्यंगार्थ

प्र.90 ) ' हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस' या वाक्यातील अलंकार ओळखा.

अ) श्लेष
ब) यमक
क) रुपक
ड) अनुप्रास
उत्तर - श्लेष

प्र.91 ) 'वीणाचे नाक चाफेकळी प्रमाणे सुंदर आहे' या वाक्यात नाक हे ------- आहे.

अ) साम्यवाचक शब्द
ब) उपमान
क) उपमेय
ड) साधारण धर्म
उत्तर - उपमेय

प्र.92 ) 'मीठभाकरी ' या शब्दाचे लिंग कोणते ?

अ) पुल्लिंग
ब) स्त्रिलिंग
क) नपुसलिंग
ड) आकारान्त पुल्लिंग
उत्तर - स्त्रिलिंग

प्र.93 ) खालील पैकी कोणता शब्द एकवचनी आहे ?

अ) भाऊ
ब) कागद
क) दिवस
ड) रात्र
उत्तर - रात्र

प्र.94 ) 'येता का आपण शिकारीला' या वाक्यातील सर्वनाम ओळखा.

अ) शिकारीला
ब) का
क) आपण
ड) येता
उत्तर - आपण

प्र.95 ) 'आई मुलांना जेवायला वाढत होती' या वाक्यातील काळ ओळखा.

अ) अपूर्ण भूतकाळ
ब) पूर्ण वर्तमानकाळ
क) साधा भूतकाळ
ड) चालू वर्तमानकाळ
उत्तर - अपूर्ण भूतकाळ

प्र.96 ) एका गावची लोकसंख्या 5000 आहे ती दरवर्षी 10 % ने वाढते, तर 2 वर्षानंतर ती किती होईल ?

अ) 6550
ब) 6050
क) 6250
ड) 5525
उत्तर - 6050

प्र.97 ) 1500 रु. मुददलाचे द.सा.द.शे. 10 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती ?

अ) 315 रु.
ब) 325 रु.
क) 300 रु.
ड) 310 रु.
उत्तर - 315 रु.

प्र.98 ) वर्षाची सुरुवात जुन महिन्याचे केल्यास क्रमाने 7 या महीना कोणता येईल ?

अ) नोव्हेंबर
ब) डिसेंबर
क) जानेवारी
ड) जूलै
उत्तर - डिसेंबर

प्र.99 ) 0.05 × 0.005 ----------- ? = 0.0005

अ) 5
ब) 0.5
क) 0.005
ड) 0.05
उत्तर - 0.5

प्र.100 ) 4500 से.मी. = किती कि. मी. ?

अ) 0.45
ब) 4.5
क) 0.0045
ड) 0.045
उत्तर - 0.045

महत्वाच्या जागा

RRB - भारतीय रेल्वे 434 जागांची भरती 2025


Last Date Reminder

BSNL भारत संचार निगम लिमिटेड 120 जागांची भरती - 2026
07-Mar-2026
MMRDA मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण भरती 2026
10-Mar-2026
CID महाराष्ट्र पोलीस भरती 2026 'सहायक शासकीय दस्तऐवज परीक्षक' पदासाठी सुवर्णसंधी
11-Mar-2026
महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) भरती 2026
20-Mar-2026
KRCL Konkan Railway कोकण रेल्वेमध्ये 190 जागांची भरती 2026
21-Mar-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology