• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
शैक्षणिक चालू घडामोडी | Current Affairs 06 May 2019

current affairs marathi 06 May 2019 - पुणे विद्यापीठ आशिया खंडात १०९ व्या स्थान

पुणे विद्यापीठ आशिया खंडात १०९ व्या स्थानावर

टाईम्स हायर एज्युकेशन रँकिंग संस्थेकडून जगभरातील विद्यापीठांची गुणांकने जाहीर करण्यात असून, त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आशिया खंडात १०९ वा क्रमांक पटकाविला आहे

फनी चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार, मदतकार्य सुरू :

भुवनेश्वर - फनी या चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 30 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे. ओडिशातल्या पुरी आणि भुवनेश्वरसह अनेक भागांत विजेचे खांब आणि झाडं उन्मळून पडले आहेत. वीज पूरवठा खंडीत झाला आहे. चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागात मदतकार्य सुरू आहे.

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मदतीची घोषणा केली आहे. पुरीतील सर्व कुटुंबांना आणि खुर्दा जिल्ह्यातील ज्या भागांना फनी चक्रीवादळाचा जास्त फटका बसला आहे, तेथील कुटुंबांना (अन्न सुरक्षा कायद्याचे संरक्षण असल्यास) 50 किलो तांदूळ, 2 हजार रुपये आणि पॉलिथिन शीट्स मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. 

नवीन पटनायक यांनी ''तीव्र' फटका बसलेल्या खुर्दा जिल्ह्याच्या उर्वरित भागातील कुटुंबांना तांदळाचा एक महिन्याचा कोटा, 1 हजार रुपये आणि पॉलिथिन शीट्स मिळणार आहेत. वादळाचा 'कमी' फटका बसलेल्या कटक, केंद्रपाडा व जगतसिंगपूर हे जिल्हे तांदळाचा एक महिन्याचा कोटा आणि 500 रुपये मिळण्यास पात्र राहतील' असे म्हटले आहे.

तसेच फनी या चक्रीवादळामुळे पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी  95100 रुपये तर कमी नुकसान झालेल्या घरांसाठी 5200 रुपये आणि किरकोळ नुकसान झालेल्या घरांसाठी 3200 रुपयांची मदत देण्याचीही घोषणा पटनायक यांनी केली आहे.

अकरावीसाठी नवा अभ्यासक्रम :

अकरावीसाठी यंदाच्या वर्षांपासून, तर पुढील शैक्षणिक वर्षांपासून बारावीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. त्याबाबतचे मसुदे जाहीर करण्यात आले आहेत. लवकरच त्याला अंतिम स्वरुप दिले जाणार आहे.

पाठय़पुस्तक मंडळाने अकरावीसाठी शैक्षणिक वर्ष २०१९-२० आणि बारावीचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून लागू होणारा पुनर्रचित अभ्यासक्रम तयार करताना विषयावर क्षमता विधानांची मांडणी केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक विषयाची इयत्तावार चढत्या श्रेणीने मांडणी केली आहे.

शिक्षणाचे दैनंदिन व्यवहारात कृतिशील उपयोजन तसेच पुढील शिक्षण संशोधन उद्योग व्यवसाय यासाठी आवश्यक कौशल्याची पायाभरणी, प्रगल्भ आणि जबाबदार नागरिकत्वाचे भान, नवनिर्मिती आणि सर्जनशीलतेचा विकास, भारतीयत्वाचा सार्थ अभिमान, विवेकनिष्ठ दृष्टिकोनाची जोपासना आणि उच्च शिक्षणासाठीची पूर्वतयारी, या नऊ बाबींवर ही मांडणी केली आहे. पाठय़पुस्तक मंडळाच्या संकेतस्थळावर त्याचे मसुदे जाहीर करण्यात आले आहेत.

पाठय़पुस्तक मंडळांचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी याबाबत सांगितले की,  प्रत्येक इयत्तेच्या अखेर आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर विद्यार्थी नेमके काय शिकले,याची एक सुस्पष्ट मांडणी करण्याच्या अनुषंगाने क्षमता विधाने तयार करून हा मसुदा तयार करण्यात आला आहे.

क्षमता विधानांच्या मसुद्यावर समाजातील जाणकार आणि सर्व संबंधित यांचे अभ्यासपूर्ण अभिप्राय पाठय़पुस्तक मंडळाने मागितला आहे. येत्या १० मेपर्यंत मंडळाच्या संकेतस्थळावर येणाऱ्या अभिप्राय आणि सूचनांचा विचार करून या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या मसुद्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. 

current affairs marathi, 11th class new syllabus, Current Affairs 06 May 2019, pune university, gk current affairs, asian university, asia university ranking

WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2026 मुदतवाढ
24-Apr-2026
NIC राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 जागांची भरती 2026
24-Apr-2026
YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असिस्टंट प्रोफेसर भरती 2026
25-Apr-2026
DRDO अप्रेंटिस 41 जागांची भरती 2026
30-Apr-2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026
30-Apr-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology