• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
SSC-HSC Board Exam | दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलली, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

SSC-HSC Board Exam | दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलली, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

SSC-HSC Board Exam | दहावी, बारावीची परीक्षा पुढे ढकलली, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय
राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 
मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली. राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. 
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, राज्यातील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिक्षण विभागाची चर्चा झाली. अशावेळी दहावी बारावी विद्यार्थ्यांचं आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. या दरम्यान लोकप्रतिनिधी, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ज्ञ यांच्याशी जी काही चर्चा झाली ती आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितली. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाने जो निर्णय घेतल आहे, तो सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रिज बोर्ड यांनी देखील घ्यावा असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.  
पहिले ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करणार
 नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच शिक्षण विभागाने घेतला. त्याआधी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा रद्द झाली असली तरी विद्यार्थ्यांना स्वाध्याय आणि चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने प्रत्येक विषयासाठी स्वाध्याय किंवा चाचणी देऊन त्यांचं मूल्यमापन करण्यात येणार असून त्यानुसारच विदयार्थ्यांचे गुण ठरवले जाणार आहेत, असे पत्र शाळांना मिळाले आहे. 
पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा
वर्षभरात विद्यार्थ्यांच्या शाळा बंद होत्या. पण शिक्षण प्रक्रिया चालूच होती. राज्यातील शाळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने अध्ययन व अध्यापन प्रक्रिया चालू होती.  इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे म्हणून शासनस्तरावरून विविध स्वरूपाचे प्रयत्न केले गेले आणि अजूनही ते सुरू आहेत. आपल्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने दिक्षा (DIKSHA) आधारित अभ्यासमाला, ज्ञानगंगा  या शैक्षणिक कार्यक्रमांचे डी. डी. सह्याद्री  वाहिनीवरून प्रक्षेपण सुरू आहे.
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – 2026 मुदतवाढ
24-Apr-2026
NIC राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात 243 जागांची भरती 2026
24-Apr-2026
YCMOU यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असिस्टंट प्रोफेसर भरती 2026
25-Apr-2026
DRDO अप्रेंटिस 41 जागांची भरती 2026
30-Apr-2026
सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026
30-Apr-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
माजलगाव उपविभागातील पोलीस पाटील भरती तपशील आणि आरक्षण
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांना वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: [email protected]

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology