RRB Level 1 Recruitment 2026 – 22000 Posts Apply Online
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1] लेव्हल-1 मधील विविध पदे | उमेदवार 10वी उत्तीर्ण / ITI किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक |
रेल्वे भरती मंडळ (RRB) यांच्यामार्फत केंद्रीकृत रोजगार सूचना (CEN) क्र. 09/2025 अंतर्गत भारतीय रेल्वेमधील लेव्हल-1 मधील विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. सुधारित सूचनेनुसार सुमारे 22,000 जागांसाठी भरती केली जाणार आहे.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 31 जानेवारी 2026 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 02 मार्च 2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) आहे. 10वी / ITI किंवा समकक्ष पात्रता असलेले पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 33 वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार लेव्हल-1 मध्ये ₹18,000 प्रारंभिक वेतन व इतर भत्ते देण्यात येतील.
ही भरती प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असून निवड केवळ गुणवत्ता यादीवर आधारित असेल. उमेदवारांनी दलाल व फसवणूक करणाऱ्या व्यक्तीं पासून सावध राहावे.



