MSCE Pune Scholarship Exam 2026 – PUP & PSS Exam Details, Eligibility, Date & Syllabus
शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलण्यात आला आहे:
- पूर्वी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी (Std 5) ऐवजी आता ती इयत्ता 4 थी (Std 4) झालेली आहे.
- पूर्वी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी (Std 8) ऐवजी आता ती इयत्ता 7 वी (Std 7) झाली आहे.
याचा अर्थ म्हणजे आता परीक्षेचे स्तर एक वर्ष खालचा केला आहे.
हा बदल शासन निर्णयानुसार 2025-26 शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात आला आहे.
शिक्षण सल्लागारांनी आणि परीक्षांचे स्तर प्रशासनाने बदलले आहेत — आता विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा एक वर्ष खालच्या इयत्तेसाठी (Std 4 आणि Std 7) घेतली जाईल, हे 2025-26 पासून सुरू असेल.
2026 च्या प्राथमिक (इ. 4 थी) आणि उच्च प्राथमिक (इ. 7 वी) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळा नोंदणी आणि माहिती प्रपत्र भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना खालीलप्रमाणे आहेत:
शाळा नोंदणी (School Registration) मुख्य नियम
- नवीन नोंदणी अनिवार्य: जरी शाळेने इ. 5 वी व इ. 8 वी साठी नोंदणी केली असेल, तरी इ. 4 थी व इ. 7 वी साठी पुन्हा स्वतंत्र नोंदणी करणे आवश्यक आहे.
- शुल्क: जर इ. 5 वी व इ. 8 वी साठी शाळा संलग्नता शुल्क भरले असेल, तर पुन्हा शुल्क भरण्याची गरज नाही. अन्यथा, 200 रुपये संलग्नता शुल्क भरणे अनिवार्य आहे.
नोंदणी प्रक्रिया आणि आवश्यक माहिती
- UDISE कोड: शाळेचा 11 अंकी UDISE कोड टाकून माहिती तपासावी. शाळेच्या नावात बदल असल्यास लेटरहेडवर विनंती अर्ज ईमेल करावा.
- अभ्यासक्रम (Curriculum): शाळेत शिकविला जाणारा अचूक अभ्यासक्रम निवडावा. केवळ महाराष्ट्र शासनाचा (MSCERT) अभ्यासक्रम असलेल्या शाळांतील विद्यार्थीच गुणवत्तेनुसार शिष्यवृत्तीस पात्र ठरतात.
- माध्यम आणि क्षेत्र: शाळेचे माध्यम आणि क्षेत्र (शहरी किंवा ग्रामीण) अचूक निवडावे. ग्रामीण/शहरी क्षेत्र चुकीचे निवडल्यास विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतो, ज्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असेल.
- संपर्क माहिती: शाळेचा ईमेल आयडी इंग्रजी स्मॉल लेटर्समध्ये अचूक भरावा, कारण त्यावरच Username व Password पाठविला जातो.
३. शाळा माहिती प्रपत्र (School Profile)
- लॉगिन: प्राप्त झालेल्या Username व Password च्या आधारे लॉगिन करून माहिती पूर्ण करावी.
- मुख्याध्यापकांची माहिती: मुख्याध्यापकांचे नाव, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी अचूक भरावा.
- फोटो व स्वाक्षरी: मुख्याध्यापकांचा फोटो आणि स्वाक्षरी एका पांढऱ्या कागदावर (8.5 सेमी x 4.5 सेमी) एकत्र करून स्कॅन करावी.
- फॉर्मेट: JPG, JPEG किंवा PNG.
फाईल साईज: 100 KB पेक्षा जास्त नसावी.
४. महत्त्वाच्या सूचना
- अचूकता: माहिती अचूक असल्याची खात्री मुख्याध्यापकांनी स्वतः करावी.
- बदल: एकदा 'Submit & Confirm' बटनावर क्लिक केल्यानंतर माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
- कागदपत्रे: नोंदणी संदर्भातील सर्व पुरावे शाळेने जतन करून ठेवावेत आणि विचारणा केल्यास परिषदेला सादर करावेत.



