शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०१७ दिलेल्या उमेदवारांना मुलाखतीसह पदभरती प्रकारांतर्गत १९६ खाजगी व्यवस्थापनातील इ.६ वी ते इ. १२ गटातील रिक्त पदांचे प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक १३/०४/२०२३ पासून दिनांक २५/०४/२०२३ पर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे.
१९६ व्यवस्थापनांच्या मुलाखतीसह पदभरतीसाठी उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत
१. सदरची सुविधा सन २०१७ मध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या उमेदवारांसाठीच आहे.
२. पवित्र पोर्टलमार्फत दिनांक १५/११/२०२२ ते ७/१२/२०२२ या कालावधीमध्ये १९६ व्यवस्थापनांच्या रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले होते. परंतू तांत्रिक कारणास्तव त्यावर पुढील प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे या व्यवस्थापनांसाठी उमेदवारांकडून नव्याने प्राधान्यक्रम घेण्यात येत आहेत.
३. यापूर्वी १९६ व्यवस्थापनांच्या पदभरतीस इच्छुक असलेल्यांनी प्राधान्यक्रम नोंदविलेले असतील त्यांनीही नव्याने प्राधान्यक्रम नोंद करणे आवश्यक आहे.
४. यापूर्वी दिनांक ७/७/२०२२ च्या सूचनांनुसार स्वप्रमाणपत्र अपडेट केलेले आहेत परंतु तांत्रिक कारणास्तव काही उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र अपडेट केलेले दिसून येत नसतील तर त्यांनी ते स्वप्रमाणपत्र अपडेट करावेत. .
5. दिनांक १५/११/२०२२ रोजी पोर्टलवर दिलेल्या सूचनांनुसार प्राधान्यक्रम लॉक करण्याची कार्यवाही करावी.
६. प्राधान्यक्रम Generate करून lock करतेवेळी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हेनसार आपण पात्र असलेलेच प्राधान्यक्रम lock करावेत.
७. काही तांत्रिक बाबीमुळे अपवादात्मक प्रकरणी Generete झालेले प्राधान्यक्रम उमेदवारांच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इत्यादिंशी सुसंगत नसेल तर असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी lock करू नयेत.
८. ज्या उमेदवारांनी यापूर्वी स्व प्रमाणपत्रामध्ये व्यावसायिक अर्हतेची नोंद करताना Degree मध्ये न करता certificate मध्ये केली असेल त्यांनी अशी नोंद Degree मध्ये करावी. उदा. B.Ed. ही अर्हता Degree मध्ये करणे आवश्यक आहे. Search
9. उमेदवारांना संगणक अर्हतेची नोंद करण्यासाठी Professional qualification type यामध्ये certificate या शीर्षकाखाली सुविधा दिलेली आहे. तेथे MSCIT ची सुविधा आहे, त्याशिवाय अन्य अर्हता नोंद करावयाची असल्यास Other निवड केल्यानंतर CCC etc सारखी संगणक अर्हता नोंद करता येईल. संगणकाशिवाय अन्य कोणत्याही D.Ed. / B.Ed./B.P.Ed.यासारख्या अर्हता Other मध्ये नोंद करू नयेत.
१०.ज्या अश्या नोंद केल्यास त्या विचारात घेतल्या जाणार नाहीत. या १९६ व्यवस्थापनांच्या इ. ६ वी ते इ. १२ वी या गटातील रिक्त पदासाठी यापूर्वी कळविल्यानुसार उमेदवारांनी https://mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर स्व प्रमाणपत्र पूर्ण (Self Certified) आहे, त्यांनाच प्राधान्यक्रम उपलब्ध होतील.
11.उमेदवारांनी + यापूर्वी https://mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर स्व प्रमाणपत्र पूर्ण केलेले नाही, त्यांनी सर्व प्रथम आपले स्व प्रमाणपत्र पूर्ण (Self Certified) करावे, त्यानंतरच त्यांना प्राधान्यक्रम उपलब्ध होऊ शकतील.
१२. ज्या उमेदवारांना त्यांचा TAIT – २०१७ चा परीक्षा क्रमांक माहित नसल्यास नजीकच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक यांचेकडे उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा दाखवून परीक्षा क्रमांक प्राप्त करून घेता येईल.
१३. लॉगीन करण्यासाठी पूर्वी नोंद असलेला mobile क्रमांक असेल तर नजीकच्या शिक्षणाधिकारी बदलला/हरवला प्राथमिक/माध्यमिक यांचेकडे उमेदवाराच्या ओळखीचा पुरावा दाखवून mobile क्रमांक बदल करून घेता येईल.
१४. TET मध्ये mismatch येत असेल तर आपण निवडलेल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक /माध्यमिक जिल्हा परिषद यांना (SED_TAIT_XXXXXXX) राणावापान /नाटयपद पाना तुमच्या ओळखीच्या पुरावा दाखवून हा mismatch दूर करता येईल.
15. उमेदवारांना प्राधान्यक्रम GENERATE करून LOCK करण्यासाठी दिनांक १३/०४/२०२३ ते दिनांक २५/०४/२०२३ पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
16. १९६ व्यवस्थापनांच्या इ. ६ वी ते इ. १२ वी या गटातील रिक्त पदांसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एका जागेकरिता १:१० या मर्यादेत ( समांतर आरक्षणासह व उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत) उमेदवार उपलब्ध होतील.
१७. उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण ३० गुण असतील, उमेदवारांची निवड या ३० गुणांच्या आधारे व्यवस्थापनाकडून होईल.