MPSC Drug Inspector Recruitment 2025-26: Revised Vacancy and Corrigendum (154 Posts)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक (Drug Inspector), गट-ब या पदासाठी सुधारित शुध्दिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या पदासाठीची मूळ जाहिरात २९ जुलै, २०२५ रोजी १०९ पदांसाठी प्रसिद्ध करण्यात आली होती. तथापि, शासनाकडून १२ जानेवारी, २०२६ रोजी प्राप्त झालेल्या अतिरिक्त मागणीपत्रानुसार ४५ पदे वाढवण्यात आली आहेत. यामुळे आता ही भरती प्रक्रिया एकूण १५४ पदांसाठी राबवली जाणार आहे
या सुधारित १५४ पदांच्या आरक्षणामध्ये आरक्षित प्रवर्गासाठी १०७ पदे आणि अराखीव (खुला) प्रवर्गासाठी ४७ पदे निश्चित करण्यात आली आहेत. आरक्षित पदांमध्ये सर्वाधिक २६ पदे इतर मागासवर्गीयांसाठी (OBC), २१ पदे अनुसूचित जातीसाठी (SC), तर १५-१५ पदे सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) ठेवण्यात आली आहेत. समांतर आरक्षणामध्ये महिलांसाठी ४७ पदे, खेळाडूंसाठी ७ पदे, अनाथांसाठी २ पदे आणि दिव्यांगांसाठी ६ पदे राखीव ठेवण्यात आली आहेत
हे शुध्दिपत्रक २५ फेब्रुवारी, २०२६ रोजी नवी मुंबई येथून प्रसिद्ध करण्यात आले असून, यातील पदसंख्या आणि आरक्षणातील बदल वगळता मूळ जाहिरातीमधील (२९ जुलै, २०२५) आणि त्यानंतरच्या शुध्दिपत्रकातील (१४ ऑगस्ट, २०२५) इतर सर्व अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत
| प्रवर्ग | अ.जा. | अ.ज. | वि.जा. (अ) | भ.ज. (ब) | भ.ज. (क) | भ.ज. (ड) | वि.मा.प्र. | सा.व शै. मागास | आ.दु.घ. | इ.मा.व. | एकूण आरक्षित | अराखीव (खुला) | एकूण पदे |
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| एकूण पदे | २१ | १३ | ०३ | ०३ | ०७ | ०३ | ०१ | १५ | १५ | २६ | १०७ | ४७ | १५४ |
| सर्वसाधारण | १४ | ०८ | ०२ | ०२ | ०५ | ०२ | ०१ | ०९ | ०९ | १७ | ६९ | ३१ | १०० |
| महिला | ०६ | ०४ | ०१ | ०१ | ०२ | ०१ | - | ०५ | ०५ | ०८ | ३३ | १४ | ४७ |
| खेळाडू | ०१ | ०१ | - | - | - | - | - | ०१ | ०१ | ०१ | ०४ | ०२ | ०७ |



