72000 जागांची मेगाभरती
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत 72 हजार जागांच्या मेगाभरतीला स्थगिती देण्यात आलेली आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमत्र्यांनी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून जनतेशी संवाद साधला आहे. ते म्हणाले मेगाभरतीच्या निर्णयामुळे मराठा समाजाला आपल्यावर अन्याय झाल्यासारखे वाटते. मात्र मेगाभरतीची प्रक्रिया सुरु केलेली नाही आणि अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, मराठा अशा सर्वांचे हित कायदेशीरपणे जपल्याशिवाय मेगाभरती सुरु केली जाणार नाही.
मराठा समाजाचे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत आहे. यामुळे राज्यात कायदा व सुववस्थेचा प्रश्न बिकट होत आहे. अशा वेळी राज्यातील जनतेला शांततेचे आवाहन करताना मुख्यमत्री म्हणाले सोशल मीडियातून मराठा आरक्षण चिघळवण्याचा प्रयत्न होत आहे.
मेगाभरती होणार होती कि फक्त निवडणूक समोर ठेवून घोषणा केली हे येणारा काळच उत्तर देईल. अलीकडेच मा. नितीन गडकरी म्हणाले होते कि, जागाच रिक्त नाहीत आणि नोकर भरती करायची कशी.
सर्व नोकरीच्या अपडेट्ससाठी www.fjs.co.in या वेबसाईटला भेट द्या.