• login
9011053200
9011053200
About us
free job support
beti bachao beti padhao
  • HOME
  • JOB
  • INDIA JOB
  • RESULT
  • ADMISSION
  • HALL TICKET
  • CUT OFF
  • YOJNA
  • CAREER
राज्यातील मेगाभरतीची प्रक्रिया जानेवारी 2019 पासून सुरु, 72 हजार पदांची भरती

maharashtra mega bharti 2019 | www.fjs.co.in

राज्य शासनातर्फे कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील सुमारे 72 हजार पदांच्या भरती कार्यवाहीचा मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी आज आढावा घेतला. सध्या बिंदूनामावली तपासणीचे काम सुरु असून त्यानंतर या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.
मुंबई : राज्यातील मेगाभरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. 72 हजार पदांच्या भरतीसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. मुख्य सचिवांनी मंगळवारी मंत्रालयात आढावा बैठक घेतली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती परीक्षा होणार असून पुढच्या आठवड्यात जाहिराती निघणार आहेत.
प्रत्येक विभागनिहाय भरती होणार असून प्रशासनाची तयारी सुरु झाली आहे. राज्य शासनातर्फे कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील सुमारे 72 हजार पदांच्या भरती कार्यवाहीचा मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी आढावा घेतला. सध्या बिंदूनामावली तपासणीचे काम सुरु असून त्यानंतर या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.
मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मेगाभरतीची प्रक्रिया आम्ही सुरु केलेली नाही आणि अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, मराठा अशा सर्वांचे हित कायदेशीरपणे जपल्याशिवाय, मेगाभरती सुरु केली जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.

मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिव गटाकडून आढावा

राज्य शासनातर्फे कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांची क्षेत्रीयस्तरावरील सुमारे 72 हजार पदे भरण्यासाठी आवश्यक त्या कार्यवाहीकरिता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दररोज सचिव गटाची बैठक होते. या सचिव गटामध्ये सामान्य प्रशासन, आरोग्य, ग्रामविकास, माहिती तंत्रज्ञान, महसूल, पाणी पुरवठा, वने या विभागाचे सचिव सदस्य आहेत. मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पदभरतीच्या प्रक्रियेसाठी गती आली असून मुख्य सचिवांमार्फत दररोज पदभरतीच्या प्रक्रियेबाबत आढावा घेतला जात आहे.
या पदांमध्ये ग्रामीण भागात क्षेत्रीयस्तरावर काम करणाऱ्या विविध संवर्गातील पदांचा समावेश असून भरती प्रक्रिया व्यवस्थित आणि लवकर होण्याकरिता नियोजन केले जात आहे. सध्या बिंदूनामावली तपासणीचे काम सुरु असून त्यानंतर या पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील, असे मुख्य सचिवांनी सांगितले.

"ही तर मिनीभरती"

दुसरीकडे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दाव्यानुसार ही मेगाभरती नाही.
कारण, राज्यात तब्बल एक लाख 80 हजार पदं रिक्त आहेत. त्यापैकी केवळ दोन वर्षात 72 हजार जागा भरणं म्हणजे केवळ अनुशेष वाढवणं आहे. कारण, दरवर्षी तब्बल 50 हजार कर्मचारी निवृत्त होतात. म्हणजे दोन वर्षात 72 हजार पदं भरुनही 28 हजाराचा अनुशेष कायम राहील.
मराठा समाजासाठी सरकार 72 हजारांपैकी 16 टक्के जागा रिक्त ठेवणार होतं. म्हणजे प्रत्यक्षात दोन वर्षात 60 हजार जागाच भरल्या जाणार होत्या. ज्या मागणीच्या प्रमाणात कमी आहेत.

कोणत्या खात्यात किती जागा?

आरोग्य खातं - 10 हजार 568 पदं
गृह खातं - 7 हजार 111 पदं
ग्रामविकास खातं - 11 हजार पदं
कृषी खातं - 2500 पदं
सार्वजनिक बांधकाम खातं - 8 हजार 337 पदं
नगरविकास खातं - 1500 पदं
जलसंपदा खातं - 8227 पदं
जलसंधारण खातं - 2 हजार 423 पदं
पशुसंवर्धन खातं - 1 हजार 47 पदं
मत्स्य खातं - 90 पदं
WhatsApp Join WhatsApp Telegram Join Telegram
राज्यातील मेगाभरतीची प्रक्रिया जानेवारी 2019 पासून सुरु, 72 हजार पदांची भरती
fjs telegram
fjs whatsapp

महत्वाच्या जागा

महाराष्ट्र बोर्ड 12वी (HSC) निकाल 2026


Punjab & Sind Bank - पंजाब अँड सिंध बँक 1000 जागांची भरती 2026


BOB बँक ऑफ बडोदा 104 जागांची भरती 2026


Last Date Reminder

IBPS एकूण 13,706 जागांची भरती 2026
21-Sep-2026
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन ‘ज्युनियर इंजिनिअर’ एकूण 1748 जागांची भरती
22-Sep-2026

शैक्षणिक चालू घडामोडी

MAHA TET 2026 ENGLISH MOCK TEST
TAIT 2025 – मुलाखतीशिवाय जाहिराती व शिफारस झालेल्या पदांचा तपशील
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) औषध निरीक्षक (गट-ब) या पदांच्या भरतीमध्ये एकूण पदे वाढलेली आहेत

प्रवेशपत्र - Hall Ticket

admit card
CTET FEB 2026 ADMIT CARD केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्र

admit card
SBI कनिष्ठ सहकारी (ग्राहक समर्थन व विक्री) भरती 2025 – प्रवेशपत्र



Age Calculator

Contact

Mobile No : (+91) 9011053200

Email Id: info@fjs.co.in

9011053200

privacy

contact

प्रतिक्रिया

हे आपले संकेतस्थळ आहे. यात आपण आपले विचार किंवा प्रतिक्रिया सुचवू शकता.

Free Job Support

© Copyrights 2025. All Rights Reserved. Free Job Support

Design & Develop By FJS Technology