Mahadiscom career | www.fjs.co.in
महापारेषण कंपनीने प्रवेश टप्प्यावरील पारेषण व स्थापत्य शाखेतील सहाय्यक अभियंता या पदाच्या रिक्त जागा GATE (Graduate Aptitude Test For Engineers ) परीक्षेमधील गुणांच्या आधारावर भरण्याचा निर्णय घेतला आहे.
गेट परीक्षेतील एकूण 100 गुणांपैकी उमेदवारास मिळालेल्या गुणांच्या आधारावर सहाय्यक अभियंता या पदासाठीच्या वैयक्तिक मुलाखतीकरिता निवड केली जाईल. जे उमेदवार महापारेषण कंपनीत नियुक्तीस इच्छुक असतील त्यांना विनंती करण्यात येते कि, त्यांनी GATE 2019 परीक्षा द्यावी.
सहाय्यक अभियंता या पदाकरिता उमेदवारांची निवड त्याने गेट 2019 या परीक्षेत 100 गुणांपैकी मिळविलेल्या गुणांच्या व वैयक्तिक मुलाखतीत मिळविलेल्या गुणांच्या आधारे केली जाईल तसेच गेट परीक्षेत मिळालेल्या गुणांना व वैयक्तिक मुलाखतीत मिळालेल्या गुणांना अनुक्रमे 80 % व 20 % भार (weightage ) देण्यात येईल.
रिक्त पदांची सविस्तर माहिती, ऑनलाईन नोंदणी, अर्ज करण्याचा व शेवटचा दिनांक इत्यादी माहिती www.fjs.co.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात येईल.
GATE 2019 साठी अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा



