राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यक्षमता वाढवून त्याला अधिक सक्षम करण्यासाठी पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. यामुळे विभागाची क्षमता वाढून चांगल्या प्रकारे काम करता येईल, अशी खात्री विभागाला आहे.
हा प्रस्ताव मंत्रालयात सादर करण्यात आला असून त्यावर नोव्हेंबर २०१८ मध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या या प्रस्तावाला गृह विभागाची मंजुरी मिळाली असून वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
उत्पादन विभागात सध्या शिपाई ते आयुक्त अशी तीन हजार सहाशे अकरा (३६११) पदे मंजूर आहेत. त्यापैकी सध्या तब्बल ३० % पदे रिक्त आहेत. त्याचा कामावर प्रतिकूल परिणाम होत असल्याने हि पदे त्वरित भरून अधिक पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला आहे.
विभागात ७७३ वाढवण्याचा प्रस्ताव आहे, त्यात चालक, कॉन्स्टेबल, दुय्यम निरीक्षक, निरीक्षक व उप अधीक्षक अशी विविध ७७३ पदे वाढवण्याचा प्रस्ताव आहे. त्यामध्ये कॉन्स्टेबल ची ६४१ पदे वाढणार आहेत.
प्रस्ताव मंजूर झाल्यास विभागामध्ये ४३८४ पदे तयार होतील.