India Post GDS Recruitment 2026 | 10th Pass Jobs
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1] ग्रामिण डाक सेवक (GDS) – BPM / ABPM / डाक सेवक | 10 वी उत्तीर्ण (गणित व इंग्रजी विषय आवश्यक) |
इंडिया पोस्ट GDS भरती 2026
Department of Posts, संचार मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी जानेवारी 2026 साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीद्वारे ब्रांच पोस्टमास्तर (BPM), असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर (ABPM) आणि डाक सेवक ही पदे भरली जाणार आहेत.
ग्रामीण डाक सेवक हे नियमित केंद्र सरकारी कर्मचारी नसून, ते GDS (Conduct and Engagement) Rules, 2020 नुसार नियुक्त केले जातात. ही नोकरी प्रामुख्याने ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी असते.
ब्रांच पोस्टमास्तर (BPM) – कामाचे स्वरूप
ब्रांच पोस्टमास्तर हा शाखा टपाल कार्यालयाचा प्रमुख असतो. त्याची मुख्य जबाबदारी पुढीलप्रमाणे असते:
-
शाखा टपाल कार्यालयाचे दैनंदिन टपाल व्यवहार सांभाळणे
-
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) सेवा हाताळणे
-
पोस्टाच्या योजना व सेवा यांचे विपणन करणे
-
टपाल वितरण व संकलनाचे काम पाहणे
-
कार्यालयीन नोंदी व अहवाल सांभाळणे
BPM उमेदवाराने स्वतःच्या खर्चाने शाखा टपाल कार्यालयासाठी जागा उपलब्ध करणे आवश्यक आहे व त्या गावात वास्तव्यास राहणे बंधनकारक आहे.
असिस्टंट ब्रांच पोस्टमास्तर (ABPM) – कामाचे स्वरूप
ABPM हे BPM ला सहाय्य करणारे पद आहे. कामे:
-
टपाल तिकीट व स्टेशनरी विक्री
-
घरपोच टपाल वितरण
-
IPPB अंतर्गत जमा/देय व्यवहार
-
BPM अनुपस्थित असताना BPM ची कामे करणे
-
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली इतर कामे
ABPM ने संबंधित टपाल कार्यालयाच्या वितरण क्षेत्रात राहणे आवश्यक आहे.
डाक सेवक – कामाचे स्वरूप
डाक सेवकांची नियुक्ती शाखा, उप-टपाल, मुख्य टपाल कार्यालये व RMS मध्ये केली जाते. कामे:
-
पत्रे व पार्सलचे घरपोच वितरण
-
टपालाची वर्गवारी व पाठवणी
-
पोस्टमास्तरांना कार्यालयीन कामात मदत
-
स्टेशनरी व टपाल सेवा विक्री
-
वरिष्ठांनी दिलेली इतर जबाबदारी
डाक सेवकाने देखील संबंधित वितरण क्षेत्रात राहणे आवश्यक आहे.
कामाचा कालावधी व मानधन
-
दररोज किमान 4 तास ते कमाल 5 तास काम
-
Time Related Continuity Allowance (TRCA) दिला जातो
-
वार्षिक वाढ व महागाई भत्ता (DA) लागू
-
GDS ग्रॅच्युइटी व सामाजिक सुरक्षा लाभ उपलब्ध
निवड प्रक्रिया
-
कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत नाही
-
10 वीच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्ट
-
निवडीनंतर कागदपत्रांची प्रत्यक्ष तपासणी केली जाते



