Bank of Baroda recruitment 2025
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1] स्थानिक बँक अधिकारी (LBO) | स्नातक पदवीधर (जे किमान ३ वर्षे अभ्यास केला आहे) |
Bank of Baroda Local Bank Officer Recruitment 2025: Complete Job Description & Eligibility, BOB LBO Bharti 2025 – Detailed Job Role, Salary, Selection Process & How to Apply, Bank of Baroda 2500 LBO Posts 2025 – Eligibility, Duties & Application Details, Full Job Profile for Bank of Baroda Local Bank Officer Bharti 2025, Everything You Need to Know About Bank of Baroda Local Bank Officer Recruitment 2025,
| S No | STATE | Vacancies | Local Language of State | SC | ST | OBC | EWS | GEN | TOTAL |
| 1 | MAHARASHTRA | 485 | Marathi | 72 | 36 | 130 | 48 | 199 | 485 |
बँक ऑफ बडोदामध्ये लोकल बँक ऑफिसर पदावर भरती, 2500 जागा भरणार, महाराष्ट्रात मराठी भाषिकांसाठी 485 जागा
बँकेमध्ये नोकरी करण्यासाठी जे उमेदवार इच्छूक आहेत, त्यांच्यासाठी मोठी अपडेट आहे. बँक ऑफ बडोदानं पात्र उमेदवारांकडून लोकल बँक ऑफिसर या पदासाठी अर्ज मागवले आहेत. बँकेकडून एकूण 2500 जागांवर भरती केली जाणार आहे. महाराष्ट्रातून एकूण 485 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी संबंधित उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. लोकल बँक ऑफिसर या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2025 इतकी आहे.
अर्ज कोण करु शकतं ? बँक ऑफ बडोदानं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. उमेदवार ज्या राज्यातून अर्ज करतील त्याच राज्यात नियुक्ती केली जाईल. ऑनलाईन अर्जासोबत फी देखील भारवी लागेल. बँक ऑफ बडोदाच्या जाहिरातीनुसार एकूण 2500 जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवारानं कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण झालेलं आवश्यक आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पदवीधारक देखील अर्ज करु शकतात. सीए, कॉस्ट अकाऊंटट, इंजिनिअरिंग किंवा वैद्यकीय पदवीधार देखील अर्ज करु शकतात. उमेदवारांचं वय 21 ते 30 दरम्यान असावं. पदवी घेतल्यानंतर संबंधित उमेदवारांकडे आरबीआयच्या यादीतील शेड्यूल कर्मशिअल बँक आणि प्रादेशिक ग्रामीण बँकेकडील किमान एक वर्ष कामाचा अनुभव असावा. उमेदवार ज्या राज्यातून अर्ज करणार आहे, त्यांच्याकडे त्या राज्यातील भाषेवर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. त्या उमेदवाराला संबंधित भाषा बोलता, लिहिता आणि वाचता आणि समजून घेता आली पाहिजे.



