Babasaheb Ambedkar swadhar yajana
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नसेल किंवा शिक्षण घेतात त्या ठिकाण शासकीय वसतिगृह नसेल अश्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून ४३००० ते ६०००० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज जमा करण्याचा अंतिम दिनांक - 31/03/2017.
अर्ज जमा करण्याचा पत्ता - सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय.
( विद्यार्थ्यांचे जातीचे प्रमाणपत्र ज्या जिल्ह्यातून काढलेले आहे त्याच जिल्ह्याच्या कार्यालयात अर्ज जमा करावा किंवा पोस्टाने पाठवावा )
शैक्षणिक पात्रता - ११ वी पासून उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी.
अधिक सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.



